News Flash

शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकरांची ‘लाईव्ह मराठी’स सदिच्छा भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आज (गुरुवार) ‘लाईव्ह मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. लाईव्ह मराठीचे व्यवस्थापकीय संपादक प्रमोद मोरे, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर अजित तांबेकर, कार्यकारी संपादक सुरेश पाटील, वरिष्ठ उपसंपादक विवेक जोशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर हे अतिशय सुंदर आणि शांत शहर आहे. पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे गतवर्षात कोल्हापूरमधील गुन्हेगारीत घट झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी लाईव्ह मराठीच्या टीमशी विविध विषयांवर अनौपचारिक चर्चाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!