कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना बुधवार पेठ येथील दिव्यांग युवक संतोष लोंढे हा पाटाला चाक असलेली गाडी हाताने ढकलत वापरत होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी सदर युवक हा शहरात ठिकठिकाणी फिरून लोकांकडून मदत घेऊन आपले कुटुंब कसेबसे चालवत आहे. सध्या शहरात वाढलेल्या रहदारीमुळे फिरत असताना अपघात होण्याची भीती सतत संतोष लोंढे यास सतावत होती. या त्याच्या समस्येबाबत त्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियाद्वारे लोकांना सायकल देण्याचे आवाहन केले होते.

या त्याच्या आवाहानाची दखल घेत, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदर चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने या दिव्यांग व्यक्तीस आज गंगावेश चौक येथे प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली.

आज (शनिवार) रोजी गंगावेश येथील चौकामध्ये भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडलाचे पदाधिकारी आणि नागरीकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष संदीप कुंभार यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. आत्मनिर्भर भारत संकल्पने अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहानाला समाजातील सर्व घटकांनी प्रतिसाद देत अशा गरजू लोकांसाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, देशाचे पंतप्रधान हे दिव्यांगांबाबत संवेदनशील आहेत. दिव्यांग व्यक्तींना जीवन जगण्यासाठी समान संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा दिव्यांगांबाबत असलेला दृष्टीकोन लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ताने प्रत्येकाने आपल्या भागातील दिव्यांग बंधू-भगिनींच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.  उपस्थित नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्ष भरत काळे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक काटकर, चंद्रकांत घाट्गे, हेमंत कांदेकर, इकबाल हकीम, विराज चिखलीकर, सुनिल पाटील, विद्या बनछोडे, श्रध्दा मेस्त्री, प्रकाश कालेकर, महेश यादव, कनैया निगवेकर, पृथ्वीराज पालकर, सौरभ निगवेकर, अवधूत ओतारी, संजय लोखंडे आदींसह उत्तरेश्वर पेठ मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.